IT Act 2000 कलम ६६ङ(इ) : खासगीपणाचे उल्लंघन केल्याबद्दल शिक्षा :

माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
कलम ६६ङ(इ) :
खासगीपणाचे उल्लंघन केल्याबद्दल शिक्षा :
जी कोणी व्यक्ती, त्या व्यक्तीच्या खासगीपणाचे उल्लंघन होईल अशा परिस्थितीत कोणत्याही व्यक्तीच्या (त्याच्या किंवा तिच्या) संमतीशिवाय तिच्या खासगी जागेची प्रतिमा उद्देशपूर्वकपणे किंवा जाणीवपूर्वकपणे हस्तगत करील, प्रसिद्ध करील किंवा पारेषित करील ती व्यक्ती तीन वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस दोन लाख रूपयांपेक्षा अधिक नसेल इतक्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस, किंवा या दोन्ही शिक्षेस पात्र असेल रूपयांपेक्षा अधिक नसेल इतक्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस, किवा या दोन्ही शिक्षेस पात्र असेल, रूपयांपेक्षा अधिक नसेल इतक्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस, किंवा या दोन्ही शिक्षेस पात्र असेल,
स्पष्टीकरण :
या कलमाच्या प्रयोजनार्थ,-
(a)क)(अ) पारेषित करणे याचा अर्थ एखाद्या व्यक्तीने किंवा व्यक्तींनी तो पाहावा या उद्देशाने एखादी दृश्य प्रतिमा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात पाठविणे;
(b)ख)(ब) प्रतिमेच्या बाबतीत हस्तगत करणे याचा अर्थ कोणत्याही साधनाद्वारे व्हिडिओ टेप करणे, फोटोग्राफ घेणे, फिल्म किंवा अभिलेख करणे;
(c)ग) (क)खासगी जागा याचा अर्थ नग्न किंवा आंतरवस्त्र घातलेले पुनरूत्पादक अवयव, गुप्त अंग, (प्युबिक एरिया), ढुंगण किंवा स्त्रीचे स्तन;
(d)घ) (ड)प्रसिद्ध करणे याचा अर्थ छापील किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात पुन्हा तयार करणे आणि ते जनतेसाठी उपलब्ध करून देणे;
(e)ङ)(इ) खासगीपणाचे उल्लंघन होईल अशा परिस्थितीत याचा अर्थ, ज्या परिस्थितीत, एखादी व्यक्ती अशी वाजवी अपेक्षा करू शकेल की,
एक) त्याच्या/तिच्या खासगी जागेची प्रतिमा हस्तगत करण्यात येत होती अशी qचता नसताना, तिने किंवा त्याने खासगीत (एकांतात) कपडे उतरवलेले असले; किंवा
दोन) मग अशी व्यक्ती सार्वजनिक किंवा खासगी ठिकाणी आहे याची तमा न बाळगता, त्याच्या किंवा तिच्या खासगी जागेचा कोणताही भाग जनतेला दिसणार नाही,
अशी परिस्थिती होय.

Leave a Reply