माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
कलम ६६ग(क) :
ओळखदर्शक गोष्टींची चोरी केल्याबद्दल शिक्षा :
जी कोणी व्यक्ती अन्य कोणत्याही व्यक्तीच्या इलेक्ट्रॉनिक सिग्नेचरचा पासवर्डचा किंवा अनन्यसाधारण ओळखदर्शक वैशिष्ट्याचा लबाडीने किंवा अप्रामाणिकपणे वापर करील ती व्यक्ती, एकतर तीन वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या करावासाच्या शिक्षेस पात्र असेल आणि तसेच एक लाख रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस देखील पात्र असेल.