IT Act 2000 कलम ६६क(अ) : १.(संदेशवहन सेवा इत्यादींमार्फत अपराधकारक संदेश पाठविण्याबाबत शास्ती :

माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
कलम ६६क(अ) :
१.(संदेशवहन सेवा इत्यादींमार्फत अपराधकारक संदेश पाठविण्याबाबत शास्ती :
१. जन विश्वास (संशोधन) अधिनियम २०२३ (२०२३ चा १८) च्या कलम २ आणि अनुसूची द्वारा वगळण्यात आला. श्रेया सिंघल विरुद्ध भारतीय संघ, एआयआर २०१५ एससी. १५२३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक २४ मार्च २०१५ च्या आदेशाने कलम ६६अ रद्द करण्यात आले आहे.
——–
जी कोणतीही व्यक्ती, संगणक साधनसामग्रीच्या साधनाद्वारे किंवा संदेशवहन साधनाद्वारे
क) जी माहिती संपूर्णत: अपराधकारक आहे किंवा भयकारक स्वरूपाची आहे अशी कोणतीही माहिती, किंवा
ख) जी माहिती खोटी असल्याचे तिला माहीत आहे. परंतु अशा संगणक साधनसामग्री किंवा दळणवळण साधनांचा केवळ त्रास देण्याच्या, गैरसोय करण्याच्या, धोका निर्माण करण्याच्या, अडथळा निर्माण करण्याच्या, अपमान करण्याच्या, इजा करण्याच्या, अपराधिक धाकदपटशा दाखवण्याच्या, शत्रुत्व, तिरस्कार किंवा दुष्ट इच्छेने वापर करण्याच्या प्रयोजनार्थ अशी कोणतीही माहिती अशा संगणक साधनसमाम्रगी किंवा दळणवळण साधनांचा नेटाने वापर करून; किंवा
ग) त्रास देण्याच्या किंवा गैरसोय करण्याच्या किंवा अशा संदेशाच्या उगमस्त्रोताबद्दल प्रेषितीस किंवा ग्रहित्यास फसविण्याच्या किंवा त्याची दिशाभूल करण्याच्या प्रयोजनार्थ कोणताही इलेक्ट्रॉनिक मेल किंवा इलेक्ट्रॉनिक मेल संदेश (मेसेज),
पाठवील ती व्यक्ती तीन वर्षापर्यंत असू शकेल इतक्या कारावासाच्या शिक्षेस व दंडास पात्र असेल.
स्पष्टीकरण :
या कलमाच्या प्रयोजनार्थ इलेक्ट्रॉनिक मेल व इलेक्ट्रॉनिक्स मेल संदेश याचा अर्थ जो संदेशाबरोबर पाठविता येईल असा मजकूर, प्रतिमा, व्हिडिओ (दृश्य), श्राव्य (ऑडिओ), व अन्य कोणताही इलेक्ट्रॉनिक अभिलेख यामध्ये निगडित असलेला संदेश किंवा माहिती यासह संगणकावर, संगणक यंत्रणेवर, संगणक साधनसामग्रीवर किंवा संदेशवहन साधनावर निर्माण केलेला किंवा पाठविलेला किंवा ग्रहण केलेला संदेश किंवा माहिती, असा आहे.

Leave a Reply