माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
कलम ६२ :
उच्च न्यायालयात अपील :
१.(अपील न्यायाधिकरणाच्या) निर्णयामुळे किंवा आदेशामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीला, सायबर न्यायालयाने तो निर्णय किंवा आदेश त्याला कळविल्याच्या दिनांकापासून साठ दिवसांच्या आत त्यामधून उद्भवणाऱ्या तथ्यविषयक किंवा कायदाविषयक प्रश्नाच्या बाबतीत उच्च न्यायालयाकडे अपील करता येईल.
परंतु, अपील करणाऱ्या व्यक्तीला उक्त कालावधीतत अपील करता न येण्यास पुरेसे कारण होते, याबाबत उच्च न्यायालयाचे समाधान झाले असेल तर ते, आणखी साठ दिवसांच्या आत अपील दाखल करण्याची त्यास मुभा देऊ शकेल.
——-
१. सन २०१७ चा अधिनियम ७ कलम १६९ द्वारे सुधारणा.