माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
कलम ४४ :
माहिती, विवरणे इत्यादी देण्यात कसूर केल्याबद्दल शास्ती :
जर हा अधिनियम किंवा त्याखालीकरण्यात आलेले कोणतेही नियम किंवा विनियम या अन्वये तसे करणे आवश्यक असलेल्या कोणत्याही व्यक्तीने-
(a)क)अ) प्रमाणन करणाऱ्या प्राधिकरणाच्या कोणत्याही नियंत्रणाला कोणतेही दस्तऐवज विवरण किंवा अहवाल देण्यात कसूर केली तर अशा प्रत्येक कसुरीसाठी ते १.(पंधरा लाख) रूपयांपेक्षा अधिक नसेल इतका दंड भरण्यास जबाबदार असेल;
(b)ख)ब) विनियमांमध्ये कोणतेही विवरण भरण्यासाठी किंवा कोणतीही माहिती, पुस्तके किंवा अन्य दस्तऐवज देण्यासाठी कालावधी विनिर्दिष्ट केलेला असताना त्या विनिर्दिष्ट कालावधीत विवरण फाईल करण्यात किंवा अन्य गोष्टी पुरविण्यात कसूर केली तर, अशी कसूर चालू राहील अशा प्रत्येक दिवसासाठी २.(पन्नास हजार) रूपयांपेक्षा अधिक नसेल अशी शास्ती भरण्यास जबाबदार असेल.
(c)ग) क) लेखी पुस्तके किंवा अभिलेख ठेवणे आवश्यक असताना ते ठेवण्यात कसूर करील तर, अशी कसूर चालू राहील अशा प्रत्येक दिवसासाठी ३.(एक लाख) रूपयांपेक्षा अधिक नसेल अशी शास्ती भरण्यास जबाबदार असेल.
——–
१. जन विश्वास (संशोधन) अधिनियम २०२३ (२०२३ चा १८) च्या कलम २ आणि अनुसूची द्वारा (एक लाख पन्नास हजार) या मजकुराऐवजी समाविष्ट केले.
२. जन विश्वास (संशोधन) अधिनियम २०२३ (२०२३ चा १८) च्या कलम २ आणि अनुसूची द्वारा (पाच हजार) या मजकुराऐवजी समाविष्ट केले.
३. जन विश्वास (संशोधन) अधिनियम २०२३ (२०२३ चा १८) च्या कलम २ आणि अनुसूची द्वारा (दहा हजार) या मजकुराऐवजी समाविष्ट केले.