माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
कलम ४२ :
प्रायव्हेट की चे नियंत्रण :
१) प्रत्येक वर्गणीदार डिजिटल सिग्नेचर प्रमाणपत्रामध्ये सूचीबद्ध केलेल्या पब्लिक की शी संबद्ध प्रायव्हेट की वर नियंत्रण ठेवण्यासाठी वाजवी प्रयत्न करील आणि १.(***) ती मिळू नये म्हणून प्रqबध करण्यासाठी सर्व उपाय योजील.
२) डिजिटल सिग्नेचर प्रमाणपत्रामध्ये सूचीबद्ध केलेल्या पब्लिक कीशी अनुरूप प्रायव्हेट की धोक्यात आली असेल तर वर्गणीदार ती गोष्ट कोणताही विलंब न करता विनियमामध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या रीतीने प्रमाणन करणाऱ्या प्राधिकरणाला कळवील.
स्पष्टीकरण :
शंका निरसनासाठी याद्वारे असे घोषित करण्यात येते की, प्रायव्हेट की धोक्यात आली आहे ही गोष्ट प्रमाणन करणाऱ्या प्राधिकरणाला कळविण्यात येईपर्यंत त्यासाठी वर्गणीदार जबाबदार असेल.
——
१.माहिती तंत्रज्ञशन (अडचणी दूर करणे) आदेश, २००२ याद्वारे वर्गणीदाराची डिजिटल सिग्नेचर लावण्यास प्राधिकृत न केलेल्या व्यक्तीला हा मजकूर वगळला.