माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
कलम ३९ :
निलंबित किंवा रद्द करण्याची नोटीस :
१) कलम (३७) किंवा कलम (३८) अन्वये डिजिटल सिग्नेचर प्रमाणपत्र निलंबित किंवा रद्द करण्यात आल्यावर प्रमाणन प्राधिकरण अशा निलंबनाची किंवा यथास्थिी रद्द करण्याची नोटीस, अशी नोटीस प्रसिद्ध करण्यासाठी डिजिटल सिग्नेचर प्रमाणपत्रामध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या संग्रहस्थानामध्ये प्रसिद्ध करील.
२) एक किंवा अधिक संग्रहस्थाने विनिर्दिष्ट करण्यात आली असतील तर अशा निलंबनाची किंवा रद्द करण्याचीनोटीस अशा सर्व संग्रह-स्थानांमध्ये प्रसिद्ध करील.