माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
कलम ३१ :
अधिनियम इत्यादीचे अनुपालन करणे प्रमाणन प्राधिकरणाने सुनिश्चित करावयाचे :
प्रत्येक प्रमाणन प्राधिकरण, त्याने नोकरीत ठेवलेली किंवा अन्यथा कामावर नेमलीली प्रत्येक व्यक्ती, तिच्या नोकरीच्या किंवा कामावर नेमण्याच्या दरम्यान या अधिनियमाच्या किंवा त्याखाली करण्यात आलेल्या नियमांच्या, विनियमांच्या आणि इतर आदेशांच्या तरतुदीचे अनुपालन करील हे निश्चित करून घ्यावे.