IT Act 2000 कलम २८ : उल्लंघनांचे अन्वेषण करण्याचा अधिकार :

माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
कलम २८ :
उल्लंघनांचे अन्वेषण करण्याचा अधिकार :
१) नियंत्रकाला किंवा त्याने त्याबाबतीत प्राधिकृत केलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याला, या अधिनियमाच्या किंवा त्याखाली करण्यात आलेल्या नियमांच्या किंवा विनियमांच्या तरतुदींच्या कोणत्याही उल्लंघनांचे अन्वेषण करण्याचे काम हाती घेता येईल.
२) नियंत्रक किंवा त्याने याबाबतीत प्राधिकृत केलेला कोणताही अधिकारी यांना आयकर अधिनियम, १९६१ याच्या प्रकरण तेरा अन्वये आयकर प्राधिकरणांकडे जे अधिकार सोपवण्यात आले आहेत त्यांचा वापर करता येईल आणि ते या अधिकारांचा त्या अधिनियमांन्वये घालून दिलेल्या मर्यादांना अधीन राहून वापर करतील.

Leave a Reply