माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
कलम २५ :
लायसेन्सचे निलंबन :
१) नियंत्रकाला, त्याला आवश्यक वाटली असेल अशी चौकशी केल्यानंतर प्रमाणन प्राधिकाऱ्याने-
(a)क)(अ) लायसेन्ससाठी किंवा त्याच्या नवीकरणासाठी केलेल्या अर्जात किंवा त्याच्या संबंधात केलेले विधान चुकीचे किंवा महत्त्वाच्या तपशीलाच्या बाबतीत खोटे असल्याचे आढळून आले असेल;
(b)ख)(ब) लायसेन्स ज्या अटी व शर्तीना अधीन राहून दिले असेल त्यांचे पालन करण्यात कसूर केल्याचे आढळून आले असेल;
(c)१.(ग)(क) कलम ३० मध्ये विनिर्दिष्ट केलेली कार्यपद्धती व मानके चालू ठेवण्यास कसूर केला असेल.)
(d)घ)(ड) या अधिनियमाच्या आणि त्याखाली करण्यात आलेले नियम, विनियम किंवा आदेश याच्या तरतुदींचे उल्लंघन करीत असल्याचे आढळून आले असेल तर तो लायसेन्स रद्द करू शकेल.
परंतु, प्रमाणन प्राधिकरणाला, प्रस्तावित रद्द करण्याच्या विरोधातील कारणे दाखविण्याची वाजवी संधी दिल्याशिवाय कोणतेही लायसेन्स रद्द करण्यात येणार नाही.
२) पोटकलम १) अन्वये लायसेन्स रद्द करण्यासाठी कोणताही आधार आहे असे मानण्यास नियंत्रकाला पुरेसे कारण असेल तर त्याने आदेश दिलेली कोणतीही चौकशी पूर्ण होईपर्यंत तो आदेशाद्वारे असे लायसेन्स निलंबित करू शकेल.
परंतु, प्रमाणन प्राधिकरणाला प्रस्तावित अशा निलंबनाविरूद्ध कारणे दाखविण्याची वाजवी संधी दिल्याखेरीज अशाप्रकारे दहा दिवसांपेक्षा अधिक काळ लायसेन्स निलंबित करण्यात येणार नाही.
३) ज्याचे लायसेन्स निलंबित करण्यात आले असेल अशा कोणत्याही प्रमाणन प्राधिकरणाने अशा निलंबनाच्या काळात कोणतेही २.(इलेक्ट्रॉनिक सही) प्रमाणपत्र देता कामा नये.
——
१.माहिती तंत्रज्ञान (अडचणी दूर करणे) आदेश, २००२ द्वारे खंड (क) ऐवजी दाखल केला.
२.सन २००९ चा अधिनियम १० च्या कलम २ द्वारे सुधारणा.