IT Act 2000 कलम १८ : नियंत्रकाची कार्ये :

माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
कलम १८ :
नियंत्रकाची कार्ये :
नियंत्रक पुढीलपैकी सर्व किंवा कोणतीही कार्ये पार पाडील:
(a)क)अ) प्रमाणन प्राधिकरणाच्या कार्यांवर पर्यवेक्षण ठेवणे;
(b)ख)ब) प्रमाणन प्राधिकरणाच्या पब्लिक की प्रमारित करणे;
(c)ग) क) प्रमाणन प्राधिकरणाने राखावयाचा दर्जा ठरवून देणे;
(d)घ) ड) प्रमाणन प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी धारण करणे आवश्यक असलेल्या अर्हता व अनुभव विनिर्दिष्ट करणे;
(e)ड) ई) प्रमाणन प्राधिकरणे ज्यांना अधीन राहून आपले कामकाज पार पाडतात त्या शर्ती विनिर्दिष्ट करणे;
(f)च) फ) १.(इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर) प्रमाणपत्र आणि पब्लिक की यांच्या संबंधात वितरीत करता किंवा वापरता येईल असा लेखी, मुद्रित किंवा दृश्य समाग्रीचा आणि जाहिरातींचा आशय विनिर्दिष्ट करणे;
(g)छ) ग) इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर प्रमाणपत्र व की याचा नमुना आणि आशय विनिर्दिष्ट करणे;
(h)ज) ह) प्रमाणन प्राधिकरण ज्या नमुन्यात व ज्या रीतीने लेखे ठेवतील ते विनिर्दिष्ट करणे;
(i)झ) आय) ज्यांना अधीन राहून लेखापरीक्षाकांची नियुक्ती करता येईल आणि त्यांना मानधन देता येईल त्या अटी व शर्ती विनिर्दिष्ट करणे;
(j)ञ) जे) प्रमाणन प्राधिकरणाने एकतर पूर्णपणे किंवा इतर प्रमाणन प्राधिकरणाबरोबर संयुक्तपणे कोणत्याही इलेक्ट्रॉनिक यंत्रणेची स्थापना करण्यासाठी आणि अशा यंत्रणेच्या विनियमनासाठी सुविधा पुरवणे;
(k)ट) के) प्रमाणन प्राधिकरणे इतर वर्गणीदारांनी त्यांचे व्यवहार ज्या रीतीने पार पाडले पाहिजेत ती रीत विहित करणे;
(l)ठ) एल) प्रमाणन प्राधिकरणे आणि वर्गणीदार यांच्यामधील हितसंबंधाविषयीच्या प्रश्नाचे निराकरण करणे;
(m)ड) एम) प्रमाणन प्राधिकरणाची कर्तव्ये घालून देणे.
(n)ढ) एन) विनियमाद्वारे विनिर्दिष्ट करण्यात आले असतील असे प्रत्येक प्रमाणन प्राधिकरणाच्या अभिलेखाचे तपशील लोकांना खुले व्हावे यासाठी उघड करण्यासाठी डाटा-बेस जतन करणे.
——-
१.सन २००९ चा अधिनियम १० च्या कलम २ द्वारे सुधारणा.

Leave a Reply