माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
प्रकरण ६ :
प्रमाणपत्र देणाऱ्या प्राधिकरणांचे विनियमन :
कलम १७ :
नियंत्रक आणि सतर अधिकारी यांची नियुक्ती :
१) केंद्र शासनाला या अधिनियमाच्या प्रयोजनासाठी प्रमाणन करणाऱ्या प्राधिकरणाच्या नियंत्रकाची, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे नियुक्ती करता येईल आणि तसेच, त्याच किंवा त्यानंतरच्या अधिसूचनेद्वारे, त्याला योग्य वाटतील इतक्या उपनियंत्रकाची आणि १.(सहायक नियंत्रकाची, सतर अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची) नियुक्ती करता येईल.
२) नियंत्रक, केंद्र शासनाच्या सर्वसाधारण नियंत्ररास आणि निदेशांस अधीन राहून आपली या अधिनियमाखालील कर्तव्ये पार पाडील.
३) उपनियंत्रक आणि सहायक नियंत्रक हे नियंत्रकाने त्याच्याकडे सोपावलेली कार्ये नियंत्रकाच्या सर्वसाधारण अधीक्षणाखाली व नियंत्रणाखाली पार पाडतील.
४)नियंत्रक, उपनियंत्रक २.(सहायक नियंत्रक इतर अधिकारी व कर्मचारी) यांच्या अर्हता, अनुभव आणि सेवेच्या अटी व शर्ती केंद्र शासनाकडून ठरविण्यात येतील त्याप्रामणे असतील.
५) नियंत्रकाचे मुख्यालय आणि शाखा कार्यालय केंद्र शासन विनिर्दिष्ट करील अशा ठिकाणी असतील आणि ती केंद्र शासनाला योग्य वाटतील अशा ठिकाणी स्थापन करण्यात येतील.
६) नियंखिाच्या कार्यालयाची एक मोहोर असेल.
——-
१.सन २००९ चा अधिनियम १० च्या कलम १२ द्वारे सुधारणा.
२.सन २००९ चा अधिनियम १० च्या कलम १२ द्वारे सुधारणा.