IT Act 2000 कलम १३ : इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड पाठवण्याची आणि स्वीकारण्याची वेळ व जागा :

माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
कलम १३ :
इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड पाठवण्याची आणि स्वीकारण्याची वेळ व जागा :
१) ओरिजिनेटर आणि प्रेषिती यांच्यामध्ये करार झाला असेल ते खेरीज करून इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड ओरिजिनेटरच्या नियंत्रणाबाहेरील संगणक साधनात प्रवेश करता तेव्हा तो पाठवण्यात आला असे होईल.
२) ओरिजिनेटर आणि प्रेषिती यांच्यामध्ये करार झाला असेल ते खेरीज करून इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड पोचल्याची वेळ पुढीलप्रमाणे निर्धारित करण्यात येईल:
(a)क)(अ) प्रेषितीने इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड स्वीकारण्यासाठी संगणक साधनर्माग नेमून दिला असेल तर-
एक) इलेक्ट्रॉनिक रेकार्ड नेमलेल्या संगणक साधनमार्गात प्रवेश करील तेव्हा तो पोहोचलेला असेल किवा
दोन) इलेक्ट्रॉनिक रेकार्ड प्रेषितीच्या ज्या संगणक साधन
मार्गाकडे पाठवला असेल तो नेमलेला साधनमार्ग नसेल तर, प्रेषिती जेव्हा तो इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड काढून घेईल तेव्हा तो पोहोचलेला असेल;
(b)ख)(ब) प्रेषितीने विर्दिष्ट वेळेत संगणक साधन नेमून दिले नसेल तर, इलेक्ट्रॉनिक अभिलेख प्रेषितीच्या संगणक साधनात प्रवेश करील तेव्हा तो पोहोचलेला असेल.
३) ओरिजिनेटर आणि प्रेषिती यांच्यामध्ये वेगळा काही करार झाला असेल ते खेरीज करून, ओरिजिनेटरच्या व्यवसायाची जागा जेथे असेल तेथून इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड पाठवण्यात आल्याचे मानण्यात येईल आणि प्रेषितीची व्यवसायाची जागा जेथे असेल तेथे ते मिळाल्याचे मानण्यात येईल.
४) संगणक साधनमार्ग जेथे असेल ती जागा जरी पोटकलम (३) अन्वये इलेक्ट्रॉनिक रेकार्ड मिळाल्याचे समजण्यात येणारी जागा जेथे असेल त्यापेक्षा वेगळ्या ठिकाणी असली तरीही, पोटकलम (२) च्या तरतुदी लागू होतील.
५) या कलमाच्या प्रयोजनासाठी –
(a)क)(अ) जर ओरिजिनेटर किंवा प्रेषिती यांच्या व्यवसायाच्या जागा एकापेक्षा अधिक असतील तर, व्यवसायाची मुख्य जागा ही व्यवसायाची जागा असेल.
(b)ख)(ब) जर ओरिजिनेटर किंवा प्रेषिती यांच्या व्यवसायाच्या जागा नसतील तर त्याची नेहमीची निवासाची जागा ही त्याच्या व्यवसायाची जागा असल्याचे मानण्यात येईल.
(c)ग) (क)निवासाची नेहमीची जागा याचा निगम निकायाच्या संबंधातील अर्थ, त्याची जेथे नोंदणी करण्यात आली असेल ती जागा असा आहे.

Leave a Reply