Ipc कलम ५३-अ : १.(काळे पाणी (निर्वासन) या निर्देशाचा अर्थ लावणे :

भारतीय दंड संहिता १८६०
कलम ५३-अ :
१.(काळे पाणी (निर्वासन) या निर्देशाचा अर्थ लावणे :
१) पुढे दिलेल्या पोटकलम (२), (३) यांमधील उपबंधांच्या अधीनतेने, त्या त्या काळी अमलात असलेल्या अन्य कोणत्याही कायद्यामधील अथवा अशा कोणत्याही कायद्याच्या किंवा कोणत्याही निरसित अधिनियमीतीच्या आधारे परिणामक असलेल्या कोणत्याही संलेखातील किंवा आदेशातील जन्मठेप काळे पाणी याचा अर्थ आजन्म कारावास असा लावला जाईल.
२)एखाद्या मुदतीच्या काळ्या पाण्याचा शिक्षादेश फौजदारी प्रक्रिया सहिंता (संशोधन) अधिनियम २.(सुधारणा १९५५) (१९५५ चा २६) यापूर्वी देण्यात आला असेल अशा प्रत्येक प्रकरणी अपराध्याला जणूकाही तितक्याच मुदतीची सश्रम कारावासाची शिक्षा देण्यात आली आहे, असे समजावे आणि त्याच रीतीने त्याच्याबाबत कार्यवाही केली जाईल.
३)त्या त्या काळी अमलात असलेल्या अन्य कोणत्याही कायद्यामधील एखाद्या मुदतीची काळ्या पाण्याची शिक्षा अथवा त्याहून कमी अशा कोणत्याही मुदतीची काळ्या पाण्याची शिक्षा (मग ती कोणत्याही नावाने संबोधलेली असो) याचा कोणताही निर्देश (उल्लेख) गाळण्यात आला असल्याचे मानले जाईल.
४)त्या त्या काळी अमलात असलेल्या अन्य कोणत्याही कायद्यातील काळे पाणी –
अ) या शब्दप्रयोगाचा अर्थ जर जन्मठेप काळे पाणी असा असेल तर अशा कोणत्याही निर्देशाचा अर्थ आजीवन कारावासाचा निर्देश म्हणून लावला जाईल;
ब) या शब्दप्रयोगाचा अर्थ जर त्याहून कमी अशा कोणत्याही मुदतीची काळ्या पाण्याची शिक्षा असा असेल तर, असा कोणताही निर्देश (उल्लेख) गाळण्यात आला असल्याचे मानले जाईल.)
———
१. १९५५ चा अधिनियम २६ – कलम ११७ व अनुसूची यांद्वारे घातले (१-१-१९५६ रोजी व तेव्हापासून).
२. १९५७ चा अधिनियम ३६ – कलम ३ व अनुसूची २ यांद्वारे १९५४ याऐवजी घातले.

Leave a Reply