भारतीय दंड संहिता १८६०
कलम ४८८ :
अशा कोणत्याही खोट्या चिन्हाचा उपयोग करण्याबद्दल शिक्षा :
(See section 350 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : अशा कोणत्याही खोट्या चिन्हाचा उपयोग करणे.
शिक्षा :३ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :कोणताही दंडाधिकारी.
——–
जो कोणी लगतपूर्व कलमाने मना केलेल्या अशा कोणत्याही खोट्या चिन्हाचा, कोणत्याही रीतीने उपयोग करील त्याने, लुबाडणूक, करण्याच्या उद्देशाने आपण तसे वागलो नव्हतो, असे शाबित केले नाही तर, जणू काही त्याने त्या कलमाविरुद्धच अपराध केलेला असावा त्याप्रमाणे त्याला शिक्षा होईल.