भारतीय दंड संहिता १८६०
कलम ४६९ :
लौकिकास बाधा आणण्याकरिता बनावटीकरण :
(See section 336(4) of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : कोणत्याही व्यक्तीच्या लौकिकाला बाध याचा या उद्देशाने किंवा त्या प्रयोजनार्थ त्याचा वापर होण्याचा संभव आहे हे माहीत असताना बनावटीकरण करणे.
शिक्षा :३ वर्षांचा कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी.
——-
जो कोणी बनावटीकरण करील आणि १.(त्या बनावट दस्तऐवजामुळे किंवा इलेक्ट्रॉनिक अभिलेखामुळे) कोणत्याही व्यक्तीच्या लौकिकास बाध यावा असा ज्याचा उद्देश असेल, किंवा त्या प्रयोजनासाठी तो वापरला जाणे संभवनीय आहे याची ज्याला जाणीव असेल त्याला, तीन वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
——-
१.सन २००० चा अधिनियम क्र. २१ याचे कलम ९१ व अनुसूचीद्वारे मूळ मजकुराऐवजी १७-१०-२००० पासून घातला.
