Ipc कलम ४४१ : फौजदारीपात्र (आपराधिक) अतिक्रमण:

भारतीय दंड संहिता १८६०
फौजदारीपात्र (आपराधिक) अतिक्रमण :
कलम ४४१ :
फौजदारीपात्र (आपराधिक) अतिक्रमण:
(See section 329 of BNS 2023)
जो कोणी दुसऱ्याच्या कब्जात असलेल्या मालमत्तेच्या जागेत किंवा जागेवर, अपराध करण्याचा अथवा अशी मालमत्ता जिच्या कब्जात असेल अशा कोणत्याही व्यक्तीला धाकदपटशा दाखविण्याच्या, तिचा अपमान करण्याच्या किंवा तिला त्रास देण्याच्या उद्देशाने प्रवेश करतो, किंवा
अशा मालमत्तेच्या जागेत किंवा जागेवर कायदेशीरपणे प्रवेश केल्यानंतर अशा कोणत्याही व्यक्तीला धाकदपटशा दाखवण्याच्या,तिचा अपमान करण्याच्या, किंवा तिला त्रास देण्याच्या उद्देशाने अथवा एखादा अपराध करण्याच्या उद्देशाने तेथे बेकायदेशीरपणे थांबून राहतो तो फौजदारीपात्र (आपराधिक) अतिक्रमण करतो, असे म्हटले जाते.

Leave a Reply