भारतीय दंड संहिता १८६०
कलम ४१८ :
जिच्या हितसंबंधाचे संरक्षण करण्यास अपराधी बद्ध आहे अशा व्यक्तीला परिणामी गैर हानी पोचू शकेल अशा जाणिवेने ठकवणूक करणे:
(See section 318(3) of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : जज्या व्यक्तीच्या हितसंबंधाचे संरक्षण करण्यास अपराधी विधित: किंवा वैध संविदेनुसार बद्ध होता त्या व्यक्तीला ठकवणे.
शिक्षा :३ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : ठकवणूक झालेली व्यक्ती.
कोणत्या नायालयात विचारणीय :कोणताही दंडाधिकारी.
——-
जर कोणी ठकवणूक केली आणि ठकवणूक ज्याच्याशी संबंधित आहे त्या संव्यवहारातील ज्या व्यक्तीच्या हितसंबंधाचे संरक्षण करण्यास तो विधित: किंवा वैध संविदेनुसार बद्ध होता त्या व्यक्तीला त्यायोगे गैरहानी पोचण्यास आपण कारण होण्याचा संभव आहे याची त्याला जाणीव असेल तर त्याला तीन वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची, किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.