भारतीय दंड संहिता १८६०
कलम ३८४ :
बलाद्ग्रहणाबद्दल शिक्षा :
(See section 308(2) of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : बलाद्ग्रहण.
शिक्षा :३ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय :कोणताही दंडाधिकारी.
——-
जो कोणी बलाद्ग्रहण करील त्याला, तीन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.