Ipc कलम ३७७ : अनैसर्गिक अपराध :

भारतीय दंड संहिता १८६०
प्रकरण १६ :
अनैसर्गिक (प्रकृती विरुद्ध) अपराधांविषयी :
कलम ३७७ :
१.(अनैसर्गिक अपराध :
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : अनैसर्गिक अपराध.
शिक्षा : आजीवन कारावास किंवा १० वर्षांचा कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र.
शमनीय या अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
——-
जो कोणी, निसर्गक्रमाविरूद्ध कोणत्याही पुरूषाशी किंवा स्त्रीशी किंवा प्राण्यांशी इच्छापूर्वक शरीरसंभोग करील त्याला, २.(आजीवन कारावासाची), किंवा दहा वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
स्पष्टीकरण : या कलमामध्ये वर्णन केलेल्या अपराधाकरिता आवश्यक तो शरीरसंभोग घडण्यास योनिप्रवेश पुरेसा आहे.)
——–
१. १९५५ चा अधिनियम २६ – कलम ११७ व अनुसूची यांद्वारे जन्मठेप काळेपाणी याऐवजी समाविष्ट करण्यात आले.
२. डब्ल्यू पी (सीव्हील) ५७२/२०१६, डब्ल्यू पी (सीआरएल) ८८, १००, १०१, १२१/२०१८ नवतेज सिंग जोहर ॲन्ड ओआरएस विरुद्ध युनियन ऑफ इंडिया. सर्वोच्च न्यायालयाने कलम २७७ रद्द केले.

Leave a Reply