Ipc कलम ३१२ : गर्भस्त्राव घडवून आणणे:

भारतीय दंड संहिता १८६०
गर्भस्त्राव घडवून आणणे, अजात गर्भजीवांना (शिशू) क्षती (दुखापत) पोहचवणे, अर्भकांना उघड्यावर टाकणे आणि अपत्यजन्माची लपवणूक करणे :
कलम ३१२ :
गर्भस्त्राव घडवून आणणे:
(See section 88 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : गर्भस्त्राव घडवून आणणे.
शिक्षा :३ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : १.( ती स्त्री जिचा गर्भपात केला आहे.)
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी.
——-
अपराध : स्पंदितगर्भा असल्यास
शिक्षा :७ वर्षांचा कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र :अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : १.( ती स्त्री जिचा गर्भपात केला आहे.)
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी.
——-
जो कोणी ईचछापूर्वक गर्भवती स्त्रीचा गर्भस्त्राव (मिस कॅरेज) घडवून आणील त्याला जर असा गर्भस्त्राव त्या स्त्रीचा जीव वाचविण्यासाठी सद्भावपूर्वक घडवून आणलेला नसेल तर, तीन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील, आणि जर ती स्त्री जर पोटात वाढलेले मूल असेल (स्पंदित गर्भ) (क्विक विथ चाईल्ड ) तर सात वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
स्पष्टीकरण:
जी स्त्री स्वत:चा गर्भस्त्राव घडवून आणते ती या कलमाच्या अर्थकक्षेत येते.
——-
१. २००९ चा अधिनियम ५ – कलम २३ द्वारा तक्त्याऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply