Ipc कलम २८८ : इमारत पाडण्याबाबत अगर दुरूस्त करण्याबाबत हयगयीचे वर्तन :

भारतीय दंड संहिता १८६०
कलम २८८ :
इमारत पाडण्याबाबत अगर दुरूस्त करण्याबाबत हयगयीचे वर्तन :
(See section 290 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : जी कोणतीही इमारत पाडून टाकण्यास किंवा तिची दुरुस्ती करण्यास हक्कदार करणारा अधिकार असलेल्या व्यक्तीने ती इमारत पाडण्यामुळे मानवी जीवितास निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्याच्या संबंधात खबरदारी घेण्याचे टाळणे.
शिक्षा :६ महिन्यांचा कारावास, किंवा १००० रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :कोणताही दंडाधिकारी.
——-
कोणतीही इमारत पाडताना किंवा दुरूस्त करताना जो कोणी ती इमारत किंवा तिचा कोणताही भाग पाडण्यामुळे मानवी जीविताला पोचणाऱ्या कोणत्याही संभाव्य धोक्यापासून सुरक्षित राहण्यास पुरेसा इतका बंदोबस्त त्या इमारतीबाबत करण्याचे जाणीवपूर्वक किंवा हयगयीने टाळील तर त्याला, सहा महिन्यांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची, किंवा एक हजार रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.

Leave a Reply