Ipc कलम २५७ : शासकीय मुद्रांक नकली तयार करण्यासाठी साधन बनविणे किंवा विकणे :

भारतीय दंड संहिता १८६०
कलम २५७ :
शासकीय मुद्रांक नकली तयार करण्यासाठी साधन बनविणे किंवा विकणे :
(See section 181 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : शासकीय मुद्रांक नकली तयार करण्यासाठी साधन बनविणे, विकत घेणे किंवा विकणे.
शिक्षा :७ वर्षांचा कारावास व द्रव्यदंड
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी.
——-
महसूलाच्या प्रयोजनार्थ (कारणाकरिता) शासनाद्वारे पुर:सृत (काढलेला) असा कोणताही मुद्रांक नकली तयार करण्यासाठी कोणतेही साधन वापरण्याच्या प्रयोजनार्थ (कारणाकरिता) अथवा तसा वापर होण्याचे उद्देशित आहे असे माहीत असून तसे समजण्यास कारण असून जो कोणी ते बनवील किंवा बनविण्याच्या प्रक्रियेचा कोणताही भाग पार पाडील किंवा ते विकत घेईल किंवा विकेल किंवा त्याची वासलात लावील, तर त्याला सात वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र होईल.

Leave a Reply