Ipc कलम २५५ : शासकीय मुद्रांक नकली तयार करणे :

भारतीय दंड संहिता १८६०
कलम २५५ :
शासकीय मुद्रांक नकली तयार करणे :
(See section 178 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : शासकीय व मुद्रांक नकली तयार करणे.
शिक्षा :आजीवन कारावास किंवा १० वर्षाचा कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :सत्र न्यायालय.
——-
जो कोणी महसूलाच्या कारणाकरिता शासनाद्वारे पुर:सृत (काढलेला) असा कोणताही मुद्रांक नकली तयार करील किंवा जाणीवपूर्वक त्याच्या नकलीकरणाच्या प्रक्रियेचा कोणताही भाग पार पाडील त्याला, १.(आजन्म कारावासाची) किंवा दहा वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
स्पष्टीकरण :
जी व्यक्ती एका अभिधानाच्या (दराचा) अस्सल मुद्रांक निराळ्या अभिधानाच्या (दराच्या) अस्सल मुद्रांकासारखा दिसेल असे करते, ती हा अपराध करते.
——–
१. १९५५ चा अधिनियम २६ – कलम ११७ व अनुसूची यांद्वारे जन्मठेप काळे पाणी याऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply