Ipc कलम २३५ : नकली नाणे तयार करण्याच्या कामी वापरण्याकरिता साधन किंवा सामग्री कब्जात बाळगणे :

भारतीय दंड संहिता १८६०
कलम २३५ :
नकली नाणे तयार करण्याच्या कामी वापरण्याकरिता साधन किंवा सामग्री कब्जात बाळगणे :
(See section 181 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : नाणे नकली तयार करण्याच्या कामी वापरण्याकरिता साधन किंवा सामग्री कब्जात बाळगणे.
शिक्षा :३ वर्षाचा कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी.
——-
अपराध : भारतीय नाणे असेल तर.
शिक्षा :१० वर्षाचा कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :सत्र न्यायालय.
——-
जो कोणी एखादे साधन किंवा सामग्री नकली नाणे तयार करण्याच्या कामी वापरण्याकरिता अथवा त्यांचा तसा वापर होण्याचे उद्देशित आहे हे माहीत असताना किंवा तसे समजण्यास कारण असताना कब्जात बाळगील त्याला, तीन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाची कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल ;
भारतीय नाणे असेल तर :
आणि नकली तयार करावयाचे नाणे १.(भारतीय नाणे) असेल, तर त्याला, दहा वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
——-
१. अनुकूलन आदेश १९५० द्वारे क्वीनचे नाणे याऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply