Ipc कलम २१४ : अपराध्याला शिक्षेपासून वाचवण्याच्या प्रतिफलादाखल (मोबदल्यात) देणगी देऊ करणे किंवा मालमत्ता परत करणे :

भारतीय दंड संहिता १८६०
कलम २१४ :
अपराध्याला शिक्षेपासून वाचवण्याच्या प्रतिफलादाखल (मोबदल्यात) देणगी देऊ करणे किंवा मालमत्ता परत करणे :
(See section 251 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : अपराध्याला शिक्षेपासून वाचवण्याच्या प्रतिफलादाखल देणगी देऊ करणे किंवा मालमत्ता परत करणे – अपराध देहांतदंड्य असल्यास.
शिक्षा :७ वर्षांचा कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र :अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी.
——
अपराध : आजीवन कारावासाच्या किंवा १० वर्षाच्या कारावासाच्या शिक्षेला पात्र असल्यास.
शिक्षा :३ वर्षाचा कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र :अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी.
——
अपराध : १० वर्षाहून कमी कारावासाच्या शिक्षेस पात्र असल्यास.
शिक्षा :अपराधासाठी उपबंधित केलेल्या कमाल मुदतीच्या एक चतुर्थांशाइतका कारावास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी.
——–
एखाद्या व्यक्तीने अपराध घडल्याचे लपवून ठेवावयाचे, किंवा तिने आपणास वैध (कायदेशीर) शिक्षेपासून वाचवावयाचे, किंवा आपणास वैध (कायदेशीर) शिक्षा घडवण्यासाठी आपणांविरुद्ध कारावासाची कार्यवाही तिने करावयाची नाही या प्रतिफलादाखल (मोबदल्यात)
जो कोणी त्या व्यक्तीला कोणतीही लाच (ग्रॅटीफिकेशन), परितोषण देईल अगर देववील अथवा देण्याची किंवा देवविण्याची तयारी दर्शवील अगर तसे कबूल करील, अगर कोणत्याही व्यक्तीला कोणतीही मालमत्ता १.(परत करील किंवा परत करवील) त्याला,
अपराध देहांतदंड्य असल्यास :
जर अपराध मृत्यूच्या शिक्षेस पात्र असेल तर, सात वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यडंडासही पात्र होईल.
आजीवन कारावासाच्या किंवा कारावासाच्या शिक्षेस पात्र असल्यास :
आणि जर अपराध २.(आजन्म कारावासाच्या) किंवा दहा वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस पात्र असेल तर, तीन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
आणि जर अपराध दहा वर्षेपर्यंत नसलेल्या इतक्या मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस पात्र असेल तर, त्या अपराधासाठी उपबंधित केलेल्या (दर्शविलेल्या) सर्वांधिक मुदतीच्या कारावासाच्या एक चतुर्थांशापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची त्या अपराधासाठी उपबंधित वर्णनाच्या कारावासाची शिक्षा, किंवा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्ष होतील.
३.(अपवाद :
ज्या कोणत्याही बाबतीत अपराध कायदेशीरपरणे आपसात मिटवता येतो त्या बाबतीत कलमे २१३ आणि २१४ यामधील उपबंध (तरतुदी) लागू होत नाहीत.)
४.(***)
——–
१. १९५३ चा अधिनियम ४२ – कलम ४ व ३ री अनुसूची यांद्वारे परत करण्याची किंवां परत करवण्याचची तयारी दर्शवील किंवा तसे कबूल करील याऐवजी समाविष्ट करण्यात आले.
२. १९५६ चा अधिनियम २६ – कलम ११७ व अनुसूची यांद्वारे जन्मठेप / काळे पाणी याऐवजी समाविष्ट करण्यात आले.
३. १८८२ चा अधिनियम ८ – कलम ६ द्वारे मूळ अपवादाऐवजी समाविष्ट करण्यात आले.
४. १८८२ चा अधिनियम १० – कलम २ व अनुसूची १ यांद्वारे उदाहरणे निरसित करण्यात आली.

Leave a Reply