भारतीय दंड संहिता १८६०
कलम १७१ :
लोकसेवक वापरतो तशी वर्दी (गणवेष) किंवा तसे ओळखचिन्ह कपटी उद्देशाने परिधान करणे किंवा जवळ बाळगणे :
(See section 205 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : लोकसेवक वापरतो तशी वर्दी किंवा तसे ओळखचिन्ह कपटी उद्देशाने परिधान करणे किंवा जवळ बाळगणे.
शिक्षा :३ महिन्यांचा कारावास किंवा २०० रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :कोणताही दंडाधिकारी.
———-
स्वत: लोकसेवकांच्या विवक्षित वर्गापैकी नसताना, आपण लोक सेवकांच्या त्या वर्गापैकी आहोत असा समज व्हावा या उद्देशाने किंवा तसा समज होणे संभवनीय आहे याची जाणीव असून जो कोणी, त्या वर्गातील लोकसेवक वापरतात तशासारखी वर्दी (गणवेष) परिधान करील, किंवा तशासारखे ओळख चिन्ह जवळ बाळगील तर त्याला, तीन महिन्यांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा, किंवा दोनशे रूपयांपर्यंतच्या द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.