भारतीय दंड संहिता १८६०
प्रकरण ९-अ :
१.(निवडणुकीसंबंधीच्या अपराधांविषयी :
कलम १७१ अ :
उमेदवार, निवडणूकविषयक हक्क यांच्या व्याख्या :
(See section 169 of BNS 2023)
या प्रकरणाच्या प्रयोजनासाठी –
२.(अ)उमेदवार याचा अर्थ ज्या व्यक्तीस कोणत्याही निवडणुकीतील उमेदवार म्हणून नामनिर्देशित करण्यात आलेले आहे ती व्यक्ती असा आहे.
ब)निवडणूकविषयक हक्क याचा अर्थ, निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे राहण्याचा किंवा उभे न राहण्याचा अथवा आपली उमेदवारी मागे घेण्याचा अथवा मतदान करण्याचा किंवा मदतान करण्यापासून परावृत्त राहण्याचा एखाद्या व्यक्तीचा हक्क असा आहे.
———-
१. १९२० चा अधिनियम ३९ – कलम २ द्वारे प्रकरण ९ वे – क समाविष्ट करण्यात आले.
२. १९७५ चा अधिनियम ४० – कलम ९ द्वारे मूळ खंड (क) ऐवजी हे दाखल करण्यात आले.