भारतीय दंड संहिता १८६०
कलम १२० :
कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेला अपराध करण्याचा बेत लपविणे :
(See section 60 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेला अपराध करण्याचा बेत लपवणे – अपराध घडल्यास.
शिक्षा :अपराधासाठी उपबंधित केलेल्या कमाल मुदतीच्या एक चतुर्थांशाइतका करावास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही
दखलपात्र / अदखलपात्र :अपप्रेरित अपराध दखलपात्र किंवा अदखलपात्र असेल त्यानुसार.
जामीनपात्र / अजामीनपात्र :अपप्रेरित अपराध जामीनपात्र किंवा अजामीनपात्र असेल त्यानुसार.
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय :अपप्रेरित अपराध ज्या न्यायालयात विचारणीय असेल ते न्यायालय.
————
अपराध : अपराध न घडल्यास
शिक्षा :अपराधासाठी उपबंधित केलेल्या कमाल मुदतीच्या एक अष्टमांशाइतका करावास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही
दखलपात्र / अदखलपात्र :अपप्रेरित अपराध दखलपात्र किंवा अदखलपात्र असेल त्यानुसार.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय :अपप्रेरित अपराध ज्या न्यायालयात विचारणीय असेल ते न्यायालय.
————
कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेला अपराध घडणे सोपे जावे म्हणून त्या उद्देशाने किंवा त्यामुळे तो सोपा होण्याचा संभव असल्याची जाणीव असते आणि त्या परिस्थितीत अपराध करण्याचा बेत अस्तित्वात असल्याचे कोणत्याही कृतीच्या किंवा अवैध अकृतीच्या द्वारे लपवील किंवा अशा बेतासंबंधी जे खोटे असल्याचे स्वत:ला माहीत आहे असे कोणतेही निवेदन करतो तर त्याला-
अपराध घडल्यास:
जर तो अपराध घडला, तर त्या अपराधासाठी उपबंधित केलेल्या कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाच्या सर्वाधिक मुदतीच्या शिक्षेच्या १/४ पर्यंत असू शकेल अशी शिक्षा होईल.
अपराध न घडल्यास:
आणि जर तो अपराध घडला नाही, तर मूळ अपराधाला असलेल्या सर्वाधिक शिक्षेच्या १/८ पर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची, किंवा त्या अपराधासाठी उपबंधित केलेल्या अशा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.