भारतीय दंड संहिता १८६०
कलम ९० :
भयापोटी किंवा गैरसमजापोटी संमती दिली असल्याची जाणीव असणे :
(See section 28 of BNS 2023)
जेव्हा दुखापत होण्याच्या भयापोटी किंवा एखाद्या तथ्याबाबतच्या गैरसमजापोटी संमती देण्यात आलेली असून, अशा भयामुळे किंवा गैरसमजामुळे ती संमती देण्यात आली हे ती कृती करणारी व्यक्ती जाणून असेल किंवा असे समजण्यास कारण असेल तर; अथवा
भ्रमिष्ट व्यक्तीची संमती – जर एखाद्या व्यक्तीने संमती असून, आपण ज्याला संमती देत आहोत त्याचे स्वरुप व परिणाम समजण्यास ती मनोविकलतेमुळे किंवा नशेमुळे असमर्थ असेल तर; अथवा
बालकाची संमती – बारा वर्षांखालील व्यक्तीने संमती दिलेली असता आणि संदर्भावरून काही विरूध्द दिसून येत नसेल तर-
अशी संमती या संहितेच्या कोणत्याही कलमाला उद्देशित असलेली अशी संमती नव्हे.