Ipc कलम ७२ : अनेक अपराधांपैकी एकाबद्दल दोषी असलेली व्यक्ती त्यांपैकी कोणत्या अपराधाबद्दल दोषी आहे ते शंकास्पद असल्याचे न्यायनिर्णयात नमूद केलेले असेल तेव्हा त्या व्यक्तीला शिक्षा:

भारतीय दंड संहिता १८६०
कलम ७२ :
अनेक अपराधांपैकी एकाबद्दल दोषी असलेली व्यक्ती त्यांपैकी कोणत्या अपराधाबद्दल दोषी आहे ते शंकास्पद असल्याचे न्यायनिर्णयात नमूद केलेले असेल तेव्हा त्या व्यक्तीला शिक्षा:
(See section 10 of BNS 2023)
न्यायनिर्णयात विनिर्दिष्ट केलेल्या (निकालपत्रात) अनेक अपराधांपैकी एका अपराधाबद्दल एखादी व्यक्ती दोषी आहे; परंतु त्यांपैकी कोणत्या अपराधाबद्दल तो दोषी आहे हे शंकास्पद आहे, असा न्यायनिर्णय देण्यात आलेल्या सर्व प्रकरणी, सर्व अपराधांसाठी सारखीच शिक्षा उपबंधित केलेली नसेल, तर त्यापैकी सर्वांत कमी शिक्षा उपबंधित केलेली असेल त्या अपराधाबद्दल अपराध्याला शिक्षा देण्यात येईल.

Leave a Reply