Ipc कलम ५३ : शिक्षा (दण्ड) :

भारतीय दंड संहिता १८६०
प्रकरण ३ :
शिक्षांविषयी :
कलम ५३ :
शिक्षा (दण्ड) :
(See section 4 of BNS 2023)
अपराधी या संहितेच्या तरतुदीप्रमाणे ज्या शिक्षांना पात्र आहेत त्या अशा:
पहिली – मृत्यू ;
१.(दुसरी – आजन्म कारावास );
तिसरी -२.(***);
चौथी – कारावास हा दोन प्रकारचा असतो :-
१) सश्रम म्हणजे सक्तमजुरीचा.
२) साधा
पाचवी – मालमत्ता समपहरण (जप्त करणे);
सहावी – द्रव्यदंड.
——–
१. १९५५ चा अधिनियम २६ – कलम ११७ व अनुसूची यांद्वारे दुसरी – काळे पाणी याऐवजी घातले. (१-१-१९५६ रोजी व तेव्हापासून)
२. १९४९ चा अधिनियम १७ – कलम २ द्वारे खंड तिसरा गाळला (६-४-१९४९ रोजी व तेव्हापासून).

Leave a Reply