Ipc कलम ५०७ : निनावी संदेशाद्वारे फौजदारीपात्र (आपराधिक) धाकदपटशा :

भारतीय दंड संहिता १८६०
कलम ५०७ :
निनावी संदेशाद्वारे फौजदारीपात्र (आपराधिक) धाकदपटशा :
(See section 351(4) of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : निनावी संदेशाद्वारे किंवा धमकी कोठून येते ते लपवून ठेवण्याची खबरदारी घेऊन फौजदारीपात्र धाकदपटशा करणे.
शिक्षा : वरील कलम ५०६ कलमाखालील शिक्षे सोबत २ वर्षाचा कारावास.
दखलपात्र / अदखलपात्र :अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी.
——-
जो कोणी निनावी संदेशाद्वारे, किंवा कोणी धमकी दिलेली आहे त्या व्यक्तीचे नाव, किंवा वास्तव्यस्थळ लपवण्याची खबरदारी घेऊन फौजदारीपात्र धाकदपटशाचा अपराध करील, त्याला त्या अपराधासाठी लगतपूर्व कलमान्वये उपबंधित केलेल्या शिक्षेच्या जोडीला दोन वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल.

Leave a Reply