Ipc कलम ४७७ : कपटीपणाने मृत्युपत्र, दत्तक घेण्यासंबंधीचे प्राधिकारपत्र किंवा मूल्यवान रोखा खोडून रद्द करणे, तो नष्ट करणे इत्यादी :

भारतीय दंड संहिता १८६०
कलम ४७७ :
कपटीपणाने मृत्युपत्र, दत्तक घेण्यासंबंधीचे प्राधिकारपत्र किंवा मूल्यवान रोखा खोडून रद्द करणे, तो नष्ट करणे इत्यादी :
(See section 343 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : कपटपणाने मृत्युपत्र, इत्यादी नष्ट करणे किंवा विरुपित करणे अथवा ते नष्ट करण्याचा किंवा विरुपित करण्याचा प्रयत्न करणे अथवा ते गुप्त राखणे इत्यादी.
शिक्षा :आजीवन कारावास किंवा ७ वर्षांचा कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र :अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी.
——-
जो दस्तऐवज म्हणजे एखादे मृत्युपत्र, मुलगा दत्तक घेण्यासंबंधीचे प्राधिकारपत्र किंवा कोणताही मूल्यवान रोखा आहे, किंवा तसा असल्याचे दिसते असा कोणताही दस्तऐवज जो कोणी कपटीपणाने, किंवा अप्रामाणिकपणाने अथवा जनतेला किंवा कोणत्याही व्यक्तीला नुकसान, किंवा क्षती पोचवण्याच्या उद्देशाने खोडून रद्द करील, नष्ट करील किंवा विरुपत करील, अथवा खोडून रद्द करण्याचा प्रयत्न करील अथवा अशा दस्तऐवजाच्या बाबतीत आगळीक करील त्याला, १.(आजन्म कारावासाची) किंवा सात वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्याही एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
——–
१. १९५५ चा अधिनियम २६ – कलम ११७ व अनुसूची यांद्वारे जन्मठेप काळे पाणी याऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply