भारतीय दंड संहिता १८६०
प्रकरण १८ :
दस्तऐवज आणि १.(***) स्वामित्व (संपत्ती) चिन्हे या संबंधीच्या अपराधांविषयी :
कलम ४६३ :
बनावटीकरण (कूटरचना) :
(See section 336(1) of BNS 2023)
जो कोणी जनतेला किंवा कोणत्याही व्यक्तीला नुकसान किंवा क्षती पोचवण्याच्या अगर कोणत्याही व्यक्तीला तिच्या मालमत्तेचा कब्जा सोडून द्यावयास लावण्याचा, अगर कोणतीही स्पष्ट किंवा उपलक्षित संविदा करण्याच्या उद्देशाने अथवा कपट करण्याच्या किंवा ते कपट करणे शक्य व्हावे या उद्देशाने कोणताही २.(खोटा दस्तऐवज किंवा खोटा इलेक्ट्रॉनिक अभिलेख किंवा दस्तऐवजाचा किंवा इलेक्ट्रॉनिक अभिलेखाचा काही भाग) बनवतो तो बनावटीकरण करतो.
——-
१. १९५८ चा अधिनियम ४३ – कलम १३५ व अनुसूची यांद्वारे व्यापार किंवा हे शब्द गाळण्यात आले.
२.सन २००० चा अधिनियम क्र. २१ याचे कलम ९१ व अनुसूचीद्वारे मूळ मजकुराऐवजी १७-१०-२००० पासून घातला.