भारतीय दंड संहिता १८६०
कलम ४२७ :
पन्नास रूपये इतक्या रकमेचे नुकसान करून आगळीक करणे:
(See section 324(4) of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : आगळीक करणे आणि त्याद्वारे ५० रुपये किंवा त्याहून अधिक रकमेचे नुकसान करणे.
शिक्षा :२ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : ज्या व्यक्तीची हानी किंवा नुकसान झाले असेल ती व्यक्ती.
कोणत्या नायालयात विचारणीय :कोणताही दंडाधिकारी.
——-
जो कोणी आगळीक करील आणि त्यायोगे पन्नास रूपये किंवा त्याहून अधिक रकमेपर्यंत हानी अथवा नुकसान घडवून आणील त्याला दोन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.