भारतीय दंड संहिता १८६०
कलम ४०० :
दरोडेखोरांच्या टोळीपैकी असल्याबद्दल शिक्षा :
(See section 313 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : नित्यश: दरवडे घालण्यासाठी संघटित झालेल्या व्यक्तींच्या टोळीपैकी असणे.
शिक्षा :आजीवन कारावास किंवा १० वर्षांचा सश्रम कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय :सत्र न्यायालय.
——-
हा अधिनियम संमत झाल्यानंतर कोणत्याही वेळी जो कोणी नित्यश: दवरडे घालण्यासाठी संघटित झालेल्या व्यक्तींच्या टोळीपैकी असेल त्याला १.(आजन्म कारावासाची), किंवा दहा वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची सश्रम कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
——-
१. १९५५ चा अधिनियम २६ – कलम ११७ व अनुसूची यांद्वारे जन्मठेप काळेपाणी याऐवजी समाविष्ट करण्यात आले.