भारतीय दंड संहिता १८६०
कलम ३९५ :
दरोडयाबद्दल शिक्षा :
(See section 310 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : दरवडा.
शिक्षा :आजीवन कारावास किंवा १० वर्षांचा सश्रम कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय :सत्र न्यायालय.
——-
जो कोणी दरवडा घालील त्याला १.(आजीवन कारावासाची) शिक्षा दहा वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची सश्रम कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
——–
१. १९५५ चा अधिनियम २६ – कलम ११७ व अनुसूची यांद्वारे जन्मठेप काळेपाणी याऐवजी समाविष्ट करण्यात आले.