Ipc कलम ३५४-अ: १.(लैंगिक सतावणूक व लैंगिक सतावणुकीसाठी शिक्षा :

भारतीय दंड संहिता १८६०
कलम ३५४-अ:
१.(लैंगिक सतावणूक व लैंगिक सतावणुकीसाठी शिक्षा :
(See section 75 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : नको असलेली शारीरिक जवळीक, उघडउघड लैंगिक इच्छा दर्शविणे त्याची मागणी करणे किंवा विनंती करणे यासारखी लैंगिक सतावणूक, अश्लील फोटो दाखवणे.
शिक्षा :३ वर्षापर्यंतचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :कोणताही दंडाधिकारी.
——-
अपराध : लैंगिक स्वरुपाचे शेरे मारण्यासारखी लैंगिक सतावणूक.
शिक्षा :१ वर्षापर्यंतचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र
कोणत्या नायालयात विचारणीय :कोणताही दंडाधिकारी.
——-
(१) एखाद्या पुरुष, पुढीलपैकी कोणतीही कृती करील तर तो, लैंगिक सतावणुकीच्या अपराधासाठी दोषी ठरेल-
(एक) शारीरिक जवळीक व नको असलेली व उघडउघड लैंगिक गोष्टीची मागणी करणारी मैत्री किंवा
(दोन) लैंगिक संबंधाची मागणी किंवा विनंती करणे; किंवा
(तीन) स्त्रीच्या इच्छेविरुद्ध, बलपूर्वक संभोगदर्शक देखावे दाखवणे; किंवा
(चार) लैंगिक स्वरुप दिलेले शेरे मारणे.
(२) जी व्यक्ती, पोटकलम (१) च्या खंड (एक) किंवा खंड (दोन) किंवा खंड (तीन) मध्ये विनिर्दिष्ट केलेला अपराध करील अशा कोणत्याही व्यक्तीला तीन वर्षांपर्यंत असू शकेल अशी कठोर कारावासाची किंवा द्रव्यदंडाची किंवा या दोन्ही शिक्षा होतील.
(३) जी व्यक्ती, पोटकलम (१) च्या खंड (चार) मध्ये विनिर्दिष्ट केलेला अपराध करील अशा कोणत्याही व्यक्तीला एक वर्षापर्यंत असू शकेल अशा कोणत्याही एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.)
——–
१.सन २०१३ चा फौजदारी कायदे (सुधारणा) अधिनियम क्र २०१३ चा १३ द्वारे घातला.

Leave a Reply