भारतीय दंड संहिता १८६०
कलम ३४४:
दहा दिवस किंवा त्याहून अधिक काळ गैर परिरोध :
(See section 127(4) of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : दहा दिवस किंवा त्याहून अधिक काळ गैरपणे परिरुद्ध करणे.
शिक्षा :३ वर्षाचा कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : परिरुद्ध केलेली व्यक्ती.
कोणत्या नायालयात विचारणीय :कोणताही दंडाधिकारी.
——-
जो कोणी कोणत्याही व्यक्तीस दहा दिवस किंवा त्याहून अधिक काळ गैरपणे परिरुद्ध करील त्याला, तीन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.