Ipc कलम ३२४ : घातक हत्यारांनी किंवा साधनांनी इच्छापूर्वक दुखापत पोचवणे :

भारतीय दंड संहिता १८६०
कलम ३२४ :
घातक हत्यारांनी किंवा साधनांनी इच्छापूर्वक दुखापत पोचवणे :
(See section 118(1) of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : घातक हत्यारांनी किंवा साधनांनी इच्छापूर्वक दुखापत पोचवणे.
शिक्षा :३ वर्षाचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र १.(अजामीनपात्र)
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :कोणताही दंडाधिकारी.
——-
कलम ३३४ मध्ये उपबंधित (तरतूद) केलेली बाब खेरीजकरुन एरवी, गोळी घालण्याचे, भोसकण्याचे किंवा कापण्याचे कोणतेही साधन किंवा हल्ल्याचे हत्यार म्हणून वापरले असता जे मृत्यूस कारण होण्याचा संभव आहे तसे कोणतेही साधन याच्या साहाय्याने अथवा आग किंवा कोणताही तप्त पदार्थ याच्या साहाय्याने अथवा कोणतेही विष किंवा कोणताही दाहक पदार्थ याच्या साहाय्याने अथवा जो पदार्थ श्वासाबरोबर आत जाणे, गिळला जाणे किंवा रक्तात पोचणे हे मानवी शरीराला अपायकारक आहे अशा कोणत्याही पदार्थाच्या साहाय्याने अथवा कोणत्याही प्राण्याच्या साहाय्याने जो कोणी इच्छापूर्वक दुखापत पोचवील त्याला, तीन वर्षेपर्यंन्त असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा किंवा द्रव्यदंडाची किवा दोन्ही शिक्षा होतील.
——-
१. फौजदारी प्रक्रिया संहिता (सुधारणा) अधिनियम २००५ (२००५ चा २५) कलम २५ द्वारे समाविष्ट केला, परंतु अजून लागू नाही.

Leave a Reply