Ipc कलम ३०९ : आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणे :

भारतीय दंड संहिता १८६०
कलम ३०९ :
आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणे :
(See section 226 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणे.
शिक्षा :१ वर्षाचा साधा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :कोणताही दंडाधिकारी.
——-
जो कोणी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करील आणि असा अपराध घडण्याच्या दृष्टीने कोणतीही कृती करील त्याला, एक वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची साध्या कारावासाची शिक्षा, १.(किंवा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.)
——-
१. १८८२ चा अधिनियम ८ – कलम ७ द्वारे आणि तसेच द्रव्यदंडाचीही शिक्षा होईल याऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply