भारतीय दंड संहिता १८६०
कलम २९६ :
धार्मिक जमावास व्यत्यय (अडथळा) आणणे :
(See section 300 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : धार्मिक उपासनेत गुंतलेल्या जमावास व्यत्यय आणणे.
शिक्षा :१ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड, किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :कोणताही दंडाधिकारी.
——-
जो कोणी धार्मिक उपासना अगर धार्मिक संस्कार करण्यात कायदेशीरपणे गुंतलेल्या (जमलेल्या) जमावास व्यत्यय आणील त्याला, एक वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा किंवा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.