Ipc कलम २९५-अ : १.(कोणत्याही वर्गाच्या धर्माचा किंवा धार्मिक श्रध्दांचा अपमान करून धार्मिक भावनांवर अत्याचार करण्याच्या उद्देशाने बुद्धिपुरस्सर व दुष्ट उद्देशाने कृती करणे :

भारतीय दंड संहिता १८६०
कलम २९५-अ :
१.(कोणत्याही वर्गाच्या धर्माचा किंवा धार्मिक श्रध्दांचा अपमान करून धार्मिक भावनांवर अत्याचार करण्याच्या उद्देशाने बुद्धिपुरस्सर व दुष्ट उद्देशाने कृती करणे :
(See section 299 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : कोणत्याही वर्गाच्या धर्माचा किंवा धार्मिक श्रद्धांचा दुष्ट उद्देशाने अपमान करणे.
शिक्षा :३ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड, किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी.
——-
जो कोणी २.(भारताच्या नागरिकांपैकी) कोणत्याही वर्गाच्या धार्मिक भावनांवर अत्याचार करण्याचे बुद्धिपुरस्सर व दुष्ट उद्देशाने ३.(तोंडी किंवा लेखी शब्दांनी अथवा चिन्हांद्वारे अगर दृश्य प्रतिरुपणांद्वारे (देखाव्यामार्फत) अगर अन्य मार्गांनी) त्या वर्गाच्या धर्माचा किंवा धार्मिक श्रध्दांचा अपमान करील, किंवा अपमान करण्याचा प्रयत्न करील तर त्याला ४.(तीन वर्षेपर्यंत) असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा, किंवा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.
——-
१. १९२७ चा अधिनियम २५ – कलम २ द्वारे हे कलम समाविष्ट करण्यात आले.
२. अनुकूलन आदेश १९५० द्वारे हिज मॅजेस्टीच्या प्रजाननांपैकी या शब्दांऐवजी हे शब्द दाखल करण्यात आले.
३. १९६१ चा अधिनियम ४१ – कलम ३ द्वारे विवक्षित शब्दांऐवजी समाविष्ट करण्यात आले.
४. १९६१ चा अधिनियम ४१ – कलम ३ द्वारे दोन वर्षे याऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply