Ipc कलम २५३ : बदल करण्यात आलेले भारतीय नाणे एखाद्या व्यक्तीने कब्जात बाळगणे, ते नाणे कब्जात आले तेव्हा त्यात बदल केला असल्याचे तिला माहीत असल्यास :

भारतीय दंड संहिता १८६०
कलम २५३ :
बदल करण्यात आलेले भारतीय नाणे एखाद्या व्यक्तीने कब्जात बाळगणे, ते नाणे कब्जात आले तेव्हा त्यात बदल केला असल्याचे तिला माहीत असल्यास :
(See section 180 (Explanation) of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : बदल करण्यात आलेले भारतीय नाणे एखाद्या व्यक्तीने कब्जात बाळगणे – ते नाणे कब्जात आले तेव्हा त्यात बदल केला असल्याचे तिला माहीत असल्यास.
शिक्षा :५ वर्षांचा कारावास व द्रव्यदंड
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी.
——-
ज्या नाणेसंदर्भात वरील कलम २४७ अगर २४९ यांपैकी कोणत्याही कलमामध्ये व्याख्या (वर्णन) केलेला अपराध करण्यात आलेला आहे ते भारतीय नाणे जेव्हा कब्जात आले तेव्हा अशा नाण्याबाबत असा अपराध घडला असल्याचे स्वत:ला माहीत असून जो कोणी कपटीपणाने अगर कपट करता यावे या उद्देशाने ते कब्जात बाळगील, तर त्याला पाच वर्षेपर्यंत असू शकेल इतकया मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र होईल.

Leave a Reply