भारतीय दंड संहिता १८६०
कलम २५२ :
बदल करण्यात आलेले नाणे एखाद्या व्यक्तीने कब्जात बाळगणे, ते नाणे कब्जात आले तेव्हा त्यात बदल केला असल्याचे माहीत असल्यास :
(See section 180 (Explanation) of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : बदल करण्यात आलेले नाणे एखाद्या व्यक्तीने कब्जात बाळगणे – ते नाणे कब्जात आले तेव्हा त्यात बदल केला असल्याचे तिला माहीत असल्यास.
शिक्षा :३ वर्षांचा कारावास व द्रव्यदंड
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी.
——-
ज्या नाण्यांबाबत वरील कलम २४६ अगर २४८ यांपैकी कोणत्याही कलमामध्ये व्याख्या (वर्णन) केलेला अपराध करण्यात आला आहे ते नाणे कब्जात आले तेव्हा होती अशा नाण्याबाबत असा अपराध घडला असल्याचे स्वत:ला माहीत असून जो कोणी कपटीपणाने अगर कपट करता यावे या उद्देशाने ते कब्जात बाळगील तर त्याला, तीन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र होईल.