भारतीय दंड संहिता १८६०
कलम २५१ :
बदल करण्यात आला आहे हे माहीत असताना कब्जात बाळगलेले भारतीय नाणे सुपूर्द (हवाली) करणे :
(See section 180 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : बदल करण्यात आले आहे हे माहीत असताना कब्जात बाळगलेले भारतीय नाणे सुपूदर्द करणे.
शिक्षा :१० वर्षांचा कारावास व द्रव्यदंड
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :सत्र न्यायालय.
——-
ज्या नाण्याबाबत आधीचे कलम २४७ किंवा २४९ मध्ये वर्णन केलेला अपराध करण्यात आलेला आहे आणि ते नाणे स्वत:च्या कब्जात असून आणि असे नाणे जेव्हा कब्जात आले तेव्हा त्याबाबत असा अपराध करण्यात आला असल्याचे माहीत असून जो कोणी कपटीपणाने अगर कपट करता यावे या उद्देशाने असे भारतीय नाणे अन्य कोणत्याही व्यक्तीकडे सुपूर्द (हवाली) करील किंवा ते स्वीकारण्यास अन्य कोणत्याही व्यक्तीस प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करील, तर त्याला दहा वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारवासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र होईल.