Ipc कलम २२० : प्राधिकार (अधिकार) असलेल्या व्यक्तीने आपण बेकायदा वागत असल्याचे माहीत असताना खटल्याच्या संपरीक्षेसाठी (सुनावणीसाठी) सुपूर्द करणे अगर बंदिवासात पाठवणे :

भारतीय दंड संहिता १८६०
कलम २२० :
प्राधिकार (अधिकार) असलेल्या व्यक्तीने आपण बेकायदा वागत असल्याचे माहीत असताना खटल्याच्या संपरीक्षेसाठी (सुनावणीसाठी) सुपूर्द करणे अगर बंदिवासात पाठवणे :
(See section 258 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : प्राधिकार असलेल्या व्यक्तीने आपण बेकायदा वागत असल्याचे माहीत असताना संपरीक्षेसाठी सुपूर्द करणे किंवा बंदिवासात पाठवणे.
शिक्षा :७ वर्षांचा कारावास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी
——-
ज्यामुळे व्यक्तींना संपरीक्षेसाठी (सुनावणीसाठी) किंवा बंदिवासात पाठवण्याचा अगर व्यक्तींना बंदिवासात ठेवण्याचा वैध (कायदेशीर) प्राधिकार (अधिकार) स्वत:ला मिळतो त्या पदावर असताना जो कोणी त्या प्राधिकाराचा (अधिकाराचा) वापर करून भ्रष्टतापूर्वक किंवा दुर्भावपूर्वक (द्वेषाने) एखाद्या व्यक्तीला संपरीक्षेसाठी (सुनावणीसाठी) किंवा बंदिवासात पाठवील, किंवा एखाद्या व्यक्तीला बंदिवासात ठेवील आणि असे करत असताना आपण बेकायदेशीर वागत आहोत याची त्यास जाणीव असेल, तर त्याला, सात वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा, किंवा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.

Leave a Reply