भारतीय दंड संहिता १८६०
कलम १९० :
लोकसेवकाकडे संरक्षणासाठी अर्ज करण्यापासून एखाद्या व्यक्तीला परावृत्त राहण्याबद्दल मन वळवण्याकरता क्षती (नुकसान) पोचवण्याचा धाक :
(See section 225 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : लोक सेवकाकडे संरक्षणासाठी कायदेशीर अर्ज करण्यापासून परावृत्त राहण्याबद्दल एखाद्या व्यक्तीचे मन वळवण्याकरिता तिला क्षती पोचवण्याचा धाक घालणे.
शिक्षा :१ वर्षाचा कारावास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही .
दखलपात्र / अदखलपात्र :अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :कोणताही दंडाधिकारी.
——–
लोकसेवकास इतरांना कोणत्याही क्षतीपासनू (नुकसानीपासून) संरक्षण देण्याचा किंवा देवविण्याचा विधित: (कायदेशीर) अधिकार प्रदान झालेल्या (दिलेल्या) कोणत्याही लोकसेवकाकडे अशा संरक्षणासाठी कायदेशीर अर्ज करण्यापासून परावृत्त राहण्याबद्दल किंवा निवृत्त होण्याबद्दल एखाद्या व्यक्तीचे मन वळविण्यासाठी जो कोणी त्या व्यक्तीला क्षती (नुकसान) पोचवण्याचा धाक दाखवील त्याला, एक वर्षपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा, किंवा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.