Ipc कलम १७१-फ : निवडणुकीत गैरवाजवी प्रभाव पाडण्याबद्दल किंवा तोतयागिरी करण्याबद्दल शिक्षा :

भारतीय दंड संहिता १८६०
कलम १७१-फ :
निवडणुकीत गैरवाजवी प्रभाव पाडण्याबद्दल किंवा तोतयागिरी करण्याबद्दल शिक्षा :
(See section 174 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : निवडणुकीत गैरवाजवी प्रभाव पाडणे.
शिक्षा :१ वर्षाचा कारावास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———–
अपराध : निवडणुकीत तोतयेगिरी करणे.
शिक्षा :१ वर्षाचा कारावास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———-
जो कोणी निवडणुकीत गैरवाजवी प्रभाव पाडण्याचा किंवा तोतयागिरी करण्याचा अपराध करील त्याला, एक वर्षपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.

Leave a Reply